Ad will apear here
Next
‘आभार मुंबई’ : मुंबई पोलिसांकडून नागरिकांबद्दल कृतज्ञता


मुंबई :
समाजासाठी आपल्या कुटुंबाला दुय्यम स्थान देऊन देशसेवेचे कर्तव्य बजावणारे पोलीस, तसेच आरोग्य व स्वच्छता कर्मचाऱ्यांबद्दल देशभरातील नागरिकांनी टाळ्या, थाळ्या वाजवल्या होत्या. नंतर सैन्यदलाच्या हेलिकॉप्टर्सनी हॉस्पिटल्सवर पुष्पवृष्टीही केली होती. आता पोलिसांनीही मुंबईतील नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले आहेत.

मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या ट्विटर हँडलवरून ‘आभार मुंबई, आम्हावरील तुमच्या विश्वासासाठी, प्रणाम मुंबई, तुमच्या पाठिंब्यासाठी वचन मुंबई - मुंबई पोलीस आहेत नेहमी या शहराच्या संरक्षणासाठी...’ असं ट्विट करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांवरचा विश्वास दर्शवणाऱ्या प्रातिनिधिक मुंबईकरांच्या प्रतिक्रियांचा व्हिडिओही त्यात आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZRECM
Similar Posts
विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांचे कान पिळण्यासाठी मुंबई पोलिसांची नामी शक्कल मुंबई : रस्त्यावर गाडी चालवताना विनाकारण हॉर्न वाजवण्याची सवय अनेकांना असते. आपल्या या सवयीचा लोकांना किती त्रास होत असेल याचा विचार हे लोक करत नाहीत. म्हणूनच अशा लोकांना वठणीवर आणण्यासाठी आणि त्यांचे कान पिळण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक नामी शक्कल लढवली आहे. त्याचा व्हिडिओही तितकाच कल्पक आहे. मुंबई पोलिसांनी
मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसच; अजित पवार उपमुख्यमंत्री मुंबई : कित्येक दिवस चाललेल्या चर्चांच्या फैरींनंतर एका रात्रीत महाराष्ट्राच्या राजकारणाने अचानक दिशा बदलली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. आज सकाळी (२३ नोव्हेंबर) या दोन्ही नेत्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली
‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ मराठीतही मुंबई : शूरवीर मराठा योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावरील तान्हाजी : द अनसंग वॉरीयर हा चित्रपट आता मराठी भाषेतही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, संपूर्ण महाराष्ट्रात दहा जानेवारी २०२० रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे
युनियन बँक ऑफ इंडियातर्फे तीन नव्या योजना मुंबई : देशभरातील कोट्यवधी ग्राहकांना शतकाहून जास्त काळ सर्वसमावेशक बँकिंग सेवा देणाऱ्या युनियन बँक ऑफ इंडियाने सोमवारी १०१वा स्थापना दिन साजरा केला. या वेळी या बँकेतर्फे तीन नवीन सुविधा दाखल करण्यात आल्या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language